औरंगाबाद दौरा अर्ध्यावर सोडून गेल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर आल्या आणि मनसेने पक्षातील गद्दार लोकांची हकालपट्टी करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्याच अनुषंगाने आज औरंगाबाद मनसे चे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने पक्षात खळबळ माजली आहे.
कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने राज ठाकरे यांनी आपला दौरा गुंडाळला आणि ते दौरा अर्ध्यावर सोडून परतीच्या प्रवासाला गेले या आशयाच्या बातम्या राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर सर्वत्र पसरल्या. या नकारात्मक घटनेने मनसेने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की नियोजित दौरा असून सुद्धा काही महत्वाच्या कामामुळे आणि औरंगाबाद येथील काम पूर्ण झाल्याने दौरा आटोपून राज ठाकरे परत रवाना झाले, मात्र पक्षातील काही गद्दार लोकांनी या अश्या अफवा उठवत बातम्यांना खतपाणी घातलं, यावेळी गडदारांवर कारवाईची भूमिका मनसेने घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.